Connect with us

गोवा खबर

जीवनावश्यक वस्तूंच्या दर

Published

on

Spread the love

 गोवा खबर: घाऊक बाजारात मोठी अंडी प्रति १०० नगा मागे रूपये ३० ते ६० ने उतरली. एस-३० जातीची साखर, कांदे आणि टोमॅटो रूपये ४०/- ते रु. २०० ने  आणि रुपये १ हजार ते २ हजार ने . प्रति क्विंटल महागले.

किरकोळ बाजारात बाहेरील उकडा तांदूळ, स्थानिक उकडा तांदूळ, सुरय तांदुळ, गहू खांडवा, गहू शिवरी, तूरडाळ बार्शी, मूगडाळ, हरभरा, मूग, हरभरा काबुली-मोठा, उत्कृष्ट गुळ, सूर्यफूल तेल (सनरिच), वनस्पती तूप डालडा, रवा, मैदा, हिरवे वाटाणे, बटाटे, हिरवी मिरची आणि वसई केळी यांचा दर आठवडाभर स्थीर होता.

किरकोळ बाजारात मैदा रुपये २/- ते रुपये ५/- ने प्रति किलो उतरला, मोठी अंडी रुपये. ४/- ते ५/- ने प्रति डझन उतरली. टोमॅटो रूपये १० ते २० ने प्रति किलो महागली. सूर्यफूल तेल (सनरिच) प्रति लिटर रुपये ५ ते रूपये १० ने महागले.

किरकोळ बाजारात परबत तांदूळ स्थानिक, बाहेरचा उकडा तांदूळ, सुरय तांदूळ, गहू खांडवा, गहू शिवरी, ज्वारी शालू, तूरडाळ बार्शी, मूगडाळ, हरभरा, मूग, हरभरा काबुली-मोठी, साखर एस-३०, उत्कृष्ट गुर, नारळाचे तेल, वनस्पती घी डालडा, रवा , कांदा, हिरवा वाटाणा, बटाटा, कांदा, हिरवी मिरची आणि केळी (वसई) यांचा दर आठवडाभर स्थीर होता.