Connect with us

गोवा खबर

पंतप्रधानांची अप्लाइड मटेरियल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गॅरी ई. डिकरसन यांच्याशी भेट

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डीसी येथे अप्लाइड मटेरियल्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गॅरी ई. डिकरसन यांची भेट घेतली.

भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट करण्यासाठी योगदान देण्याकरता अप्लाइड मटेरियल्सला

पंतप्रधानांनी आमंत्रित केले. भारतातील प्रक्रिया तंत्रज्ञान आणि प्रगत पॅकेजिंग क्षमतांच्या विकासासाठीही अप्लाइड मटेरियल्सला पंतप्रधानांनी आमंत्रित केले.

पंतप्रधान आणि डिकरसन यांनी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी भारतातील शैक्षणिक संस्थांसोबत अप्लाइड मटेरियल्सच्या सहकार्याच्या संभाव्यतेवर चर्चा केली.