Connect with us

गोवा खबर

गोव्यात होणार्‍या ‘सी-20 परिषदे’च्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन !

Published

on

Spread the love

गोवा खबर: 27 मे या दिवशी गोव्यातील वास्को येथे प्रथमच होणार्‍या ‘सी-20 परिषदे’च्या माहिती पुस्तिकेचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्रीप्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रकाशन करण्यात आलेया वेळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन समन्वयक सौश्वेताडॉ.(सौ.) अमृता देशमाने आणि व्यावसायिक श्रीनारायण नाडकर्णी हे उपस्थित होते.

    मुख्यमंत्र्यांच्या पणजी येथील शासकीय निवासस्थानी आंतरराष्ट्रीय ‘जी-20’साठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहेया कक्षातच ‘सी-20 परिषदे’च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलेया ‘सी-20 परिषदे’चे आयोजन गोवा सरकार, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ आणि ‘भारतीय विद्या भवननवी दिल्ली’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

27 मे या दिवशी ‘विविधतासर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर ‘सी-20 परिषद’ वास्को येथे होणार आहेयात गोव्यासह देशविदेशांतील मान्यवर वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेतया प्रकाशनानंतर मामुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले विविध आध्यात्मिक संशोधन आणि देशविदेशांतील कार्य यांविषयी जाणून घेत या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुकही केले.