Connect with us

गोवा खबर

विरोधी पक्षनेते आलेमाव यांच्या कडून सोमेया कुमारीचे अभिनंदन

Published

on

Spread the love
गोवा खबर:विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५०२ वा क्रमांक पटकावणाऱ्या वेरोडा-कुंकळ्ळी येथील  सोमेया कुमारीच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले.
कुमारी सोमेया कुमारीने एसएससीपर्यंतचे शिक्षण कुंकळ्ळी येथील मारिया बाम्बिना कॉन्व्हेंटमध्ये घेतले. तिच्या भावी कारकिर्दीसाठी मी तिला माझ्या शुभेच्छा दिल्या. तिची आई  सियामणी देवी, वडील जितेंद्र सिंग (निवृत्त लष्करी अधिकारी), तिची भावंडे, सहयोगी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांचे ही अभिनंदन असे युरी आलेमाव यांनी सांगितले.