Connect with us

देश खबर

झेवियर्स महाविद्यालयात फडकला अभाविप चा झेंडा

Published

on

Spread the love
जी. एस. निवडणुकीत साहिल महाजन भव्य विजयी
गोवा खबर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवा ने झेवियर्स महाविद्यालयात झालेल्या महाविद्यालयीन निवडणकीत मोठे विजय प्राप्त केले. महाविद्यालयातील प्रत्येक वर्गाचे अभाविप ला समर्थन आहे. निवडणुकीत जी.एस. पदी अभाविप म्हापसा शहर मंत्री साहिल महाजन यांने बहुमताने यश नोंदविले.
निवडणुकीनंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम दाखवत जयघोष केला. त्यानंतर महाविद्यालय ते म्हापासाचे आराध्य दैवत श्री बोडगेश्वर मंदिर पर्यंत भव्य रैलीचे आयोजन केले होते. रैली दरम्यान विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभविप मागील तीन वर्षांपासून झेवियर्स महाविद्यालयात खूप चांगले कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थी परिषद सतत अग्रेसर असते अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दर्शविली.
छात्र शक्ती हीच राष्ट्र शक्ती ह्या विद्यार्थी परिषदेच्या विचारावर आम्ही ही निवडणूक लढविली व जिंकली. आजच्या विजयानंतर आता आम्ही महाविद्यालयात नव्या जोमाने काम करू असे  नवनिर्वाचित जी.एस. साहिल महाजन म्हणाले. हा विजय महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा आहे असे यावेळी शुभेच्छा देताना कोंकण प्रांत सहमंत्री अवधूत कोटकर याने म्हटले. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांची प्रत्येक समस्या तसेच नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी अभाविप कटिबद्ध आहे हे आश्वासन गोवा विभाग संयोजक धनश्री मांद्रेकर हिने दिले.