Connect with us

गोवा खबर

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची भेट घेतली

Published

on

Spread the love

 

 

 गोवा खबर:केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि मत्स्योद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी  आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांनी 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या महोत्सवात  भारतातून तसेच जगभरातून नामवंत  आणि चित्रपट क्षेत्रातील मंडळी  मोठ्या संख्येने सहभागी  होण्याची अपेक्षा असल्याने,  अत्यंत उच्च दर्जाची तयारी सुनिश्चित  करण्याकडे  विशेष लक्ष दिले जात आहे.

 

मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांनी गोव्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या पैलूंवर तसेच या क्षेत्राच्या वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील यावरही चर्चा केली. 53 वा इफ्फी महोत्सव  आणि इतर विविध विकास प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले होते.