Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गुरू नानक देवजींच्या जयंतीनिमित्त गोव्यातील लोकांना विशेषतः शीख बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात “गुरु नानक देवजी हे एक महान द्रष्टा, संत आणि गूढवादी होते ज्यांनी जगाला अध्यात्म, मानवता, नैतिकता, भक्ती आणि सत्य या शाश्वत मूल्यांचे सखोल ज्ञान दिले. वासना,  लोभ, आसक्ती,  क्रोध आणि अहंकार या पाच दुर्गुणांवर मात करण्याचा त्यांचा उपदेश अशा अनिष्ट प्रभावांनी ग्रासलेल्या सध्याच्या जगासाठी अतिशय समर्पक आहे. त्यांच्या शिकवणीने आम्हाला आपल्या देशाची एकता आणि धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन टिकवून ठेवण्यात मदत झाली आहे.”

“गुरु नानक जयंतीदिनी शांतता आणि सलोख्याचे जीवन जगण्यासाठी आपण त्यांच्या मौल्यवान शिकवणींचे पालन करण्यासाठी वचनबद्ध होऊया असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.