गोवा खबर:भाजपा नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना आज हणजुणे पोलिसांनी म्हापसा येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, सोनाली फोगाट खून प्रकरणी हणजुणे पोलिसांनी हणजुणे येथील कर्लीस क्लबच्या मालकाला अटक केली आहे. पोलिसांनी क्लबच्या बाथरूममधून ड्रग्जही जप्त केले आहेत.
शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसांनी यापूर्वीच सुधीर सांगवान आणि सुखबिंदरला सिंगला अटक केली होती. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सोनालीच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा असल्याचे समोर आले आहे. सोनाली पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासह 22 ऑगस्टला गोव्यात पोहोचल्या होत्या.
सोनाली खून प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई करत कर्लीस क्लबचा मालक एडविन नूनीस आणि ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर यांना देखील अटक केली आहे.खून प्रकरणात अटक केलेल्या संशयितांना ड्रग्स पुरवल्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.