Connect with us

गोवा खबर

गोवा इन्स्टिट्युट मॅनेजमें द्वारे जीओएएल कार्यक्रम: व्यावसायिकांना त्यांची स्वप्ने साकारण्याची संधी

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:महत्त्वाकांक्षी   कार्यरत व्यावसायिक लोकांसाठी गोवा इन्स्टिट्युट मॅनेजमेंट ह्या संस्थेने एआईसीटीई मंजूर २ वर्षीय पोस्ट ग्रेडूयेट डिप्लोमा इन मॅनेजमेंट कार्यक्रम आयोजित केला आहे.

स्वतःच्या प्रकारचा पहिला असा हा ऑनलाइन कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या साधनांवर वर्गाचा अनुभव देण्याच्या उद्धिष्ठेने बनविलेला आहे. कार्यक्रम ऑनलाइनच नाही तर विद्यार्थ्यांना  ऑफलाईन सुद्धा  हा कॅम्पस २ आठवड्यांसाठी अनुभवता येणार. ह्या २ आठवड्यात विद्यार्थी उद्योगातील दिग्गजांची अनेक सत्रे पण अनुभवतील.

हा कार्यक्रम चार सेमेस्टर मध्ये विभागला गेला आहे ज्याची सत्रे आठवड्याच्या शेवटी ऑनलाइन मोडवर होणार आहे तर ह्या अभ्यासक्रमात मार्केटिंग, ऑपरेशन, स्ट्रेटेजिक अकाउंटिंग, ओबी, एचआर, एथिक्स इत्यादी विषयांवर समावेश आहे. हा स्पर्धात्मक किमतीचा कार्यक्रम व्यावसायिकांना त्यांच्या सोईनुसार २ वर्षाचा कार्यक्रम ५ वर्षापर्यंत वाढवण्याचा पर्याय देत तर कॅम्पस मधील अटळ इनकुबॅशन  द्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांसाठी समर्थन देखील देत.

तर हयात संदर्भात जीआईएमाचे संचालक डॉ. अजित परुळेकर म्हणाले, “जीओएएल पिजीडीएम  कार्यक्रम संपूर्ण भारतातील व्यावसायिकांना प्रीमियर व्यवस्थापन शिक्षणासाठी  जीआईएमाशी जोडण्याची एक महत्त्वाची नवीन संधी उघडतो. जीओएएल पिजीडीएम भविष्यवादी, तंत्रज्ञान-सक्षम आहे आणि मदत करेल असे पण त्यांनी जोडले. कार्यरत व्यावसायिकांना जीआईएमा च्या  कौशल्याचा फायदा होतो. या नाविन्यपूर्ण पिजीडीएम ची लवचिकता सहभागींना त्यांचे काम आणि जीवन संतुलनाशी तडजोड न करता त्यांची संसाधने ऑप्टिमाइझ करण्यास सक्षम करेल.