Connect with us

गोवा खबर

आसामी चित्रपटसृष्टीमध्ये सशक्त पुनरागमन दिसून येत आहे: अंतरा जीजी चौधरी

Published

on

Spread the love

प्रादेशिक चित्रपटनिर्माते अधिकाधिक प्रमाणात प्रभावी कथा विस्तृत प्रमाणातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असून, आसामी चित्रपट जोरदार पुनरागमन करताना दिसत आहेत, असे प्रतिपादन चित्रपटनिर्मात्या अंतरा जीजी चौधरी यांनी केले.

गोवा खबर:गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) पत्रसूचना कार्यालयाने आज आयोजित केलेल्या चौधरी यांच्या सुरज्यमुखी या आसामी फिचर फिल्मवर आधारित पत्रकार परिषदेत त्या बोलता होत्या.   

हा चित्रपट उत्पल नावाच्या मुलावर बेतलेला असून तो 40 वर्षांनंतर स्वतःच्या आयुच्याचा पुन्हा आढावा घेतो आणि मानवी निवडी कशा प्रकारेआयुष्ये बदलतात आणि कायमस्वरूपी परिणाम करतात याचा शोध घेतो. गोव्यात सुरु असलेल्या इफ्फीमध्ये 22 नोव्हेंबर रोजी सुरज्यमुखी चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला.

सदर चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाल्या की सुर्याविषयी त्यांना वाटणारे आकर्षण त्यांच्या कलात्मक आविष्कारांवर पुनःपुन्हा प्रभाव टाकत असते. या कथेच्या साधेपणाकडे आणि सुरज्यमुखी मधील प्रभावी मध्यवर्ती पात्राकडे त्या आकर्षित झाल्या असे त्यांनी सांगितले. या चित्रपटाचे सार्वत्रिक आकर्षण अधोरेखित करत, चौधरी यांनी या चित्रपटाची संकल्पना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील प्रेक्षकांच्या मनाला भिडेल असा विश्वास व्यक्त केला. प्रादेशिक चित्रपटनिर्मितीसाठी सर्जनाची नवी उर्जा तसेच वाढत्या संधी लक्षात घेत त्यांनी आसामी चित्रपटांमधील बदलत्या परीदृश्याबद्दल देखील चर्चा केली.   

चित्रपटासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल इफ्फीप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांनी या महोत्सवात त्यांचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा अनुभव म्हणजे “सुंदर भावना” होती असे सांगितले.

आकाशनील शर्मा यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले

पत्रकार परिषदेचा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा:

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

Continue Reading