Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ‘भारत पर्व’मधील गोव्याच्या स्टॉलला भेट; कुणबी हातमाग कलेचे केले कौतुक

Published

on

Spread the love

गोवा खबर:गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे आयोजित १५ दिवसांच्या भव्य ‘भारत पर्व’ प्रदर्शनात गोवा पर्यटन विभागाच्या स्टॉलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गोव्याच्या पारंपारिक कुणबी हातमाग कापड आणि हस्तकलेची सविस्तर माहिती जाणून घेतली.

या भेटीबाबत माहिती देताना डॉ. स्नेहा भागवत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनानंतर खास वेळ काढून गोवा सरकारच्या पर्यटन विभागाच्या स्टॉलला भेट दिली. गोव्यामध्ये अशा प्रकारे हातमागाचे (हँडलूम) काम होते हे ऐकून पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आणि “असेच चांगले काम पुढे सुरू ठेवा,” अशा शब्दांत कौतुक करत प्रोत्साहन दिले.

गोवा पर्यटन विभागाने उभारलेल्या या स्टॉलवर पारंपारिक कुणबी साड्या, कुणबी कापडापासून तयार केलेली विविध उत्पादने, कावी आर्ट, नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या कलाकृती, तसेच गोव्याचे प्रसिद्ध काजू आणि खाजे यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. विविध संस्कृतींचा संगम घडवून आणणाऱ्या या महोत्सवात गोव्याच्या या स्टॉलला आणि पारंपारिक कलांना पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.