Connect with us

गोवा खबर

पार्सेकर आणि उत्पल यांच्या भाजप प्रवेशामुळे विद्यमान आमदारांवर परिणाम नाही; ‘भिवपाची गरज ना’ : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाच्या विद्यमान आमदारांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे विद्यमान आमदारांनी चिंता करण्याचे कारण नाही. ‘भिवपाची गरज ना’, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.