Connect with us

गोवा खबर

२४ ऑक्टोबर रोजी प्रलंबित म्युटेशनच्या निकालासाठी विशेष शिबीरे

Published

on

Spread the love

गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे, जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि प्रलंबित म्युटेशन प्रकरणे निकालात काढण्यासाठी, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते संध्या ५ वाजेपर्यंत दक्षिण गोवा जिल्ह्यातील फोंडा, सासस्टी आणि मुरगांव तालुक्यांमधील मामलेदार आणि संयुक्त मामलेदारांच्या संबंधित कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या नागरिकांची म्युटेशन प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांनी आपल्या प्रकरणांसंबंधी माहिती मिळविण्यासाठी आणि लागू असलेल्या नियमानुसार व कार्यपद्धतीनुसार त्यांच्या निकालाची सोय करण्यासाठी संबंधित मामलेदार/संयुक्त मामलेदारांच्या संबंधित कार्यालयांना भेट द्यावी. अर्जदारांना त्यांच्या प्रलंबित म्युटेशन प्रकरणांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याचा सल्ला देण्यात येत आहे.