Connect with us

गोवा खबर

नाना पाटेकर यांच्या निधनाने अभिनेते सयाजी शिंदे भावुक; गोमेकॉत जाऊन वाहिली श्रद्धांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अभिनेते सयाजी शिंदे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) शवविच्छेदन गृहात जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे भावुक झाले.

सयाजी शिंदे म्हणाले की, आज सकाळी सात वाजता मला नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजली. सुरुवातीला या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. ही बातमी खोटी असावी, असे वाटत होते.

मी जवळच एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. निधनाची बातमी समजल्यानंतर खात्री करण्यासाठी तातडीने गोव्यात आलो. मात्र, येथे आल्यानंतर ही दुःखद बातमी खरी असल्याचे समजले, असे त्यांनी सांगितले.

नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींबद्दल विचारले असता सयाजी शिंदे भावुक झाले. नानांसोबतच्या खूप आठवणी आहेत. मात्र, सध्या त्याबद्दल बोलण्याच्या मनःस्थितीत नाही. मला त्यांना भेटायचे होते, असे त्यांनी सांगितले.

नाना पाटेकर यांच्याशी शेवटचे बोलणे साधारण दीड ते दोन महिन्यांपूर्वी झाले होते, अशी माहितीही सयाजी शिंदे यांनी दिली.