Connect with us

गोवा खबर

पीडब्ल्यूडी कंत्राटी कामगारांना नियमित करून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ द्या : अजय प्रभुगावकर

Published

on

Spread the love

गोवा खबर: सार्वजनिक बांधकाम खात्यात (PWD) कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या पात्र कामगारांना सेवेत नियमित करून त्यांना नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व पात्र लाभ देण्यात यावेत, अशी मागणी अॅड. अजय प्रभुगावकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

पीडब्ल्यूडीमध्ये अनेक कामगार कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावत असून त्यांच्या सेवेशी संबंधित प्रश्न सरकारने तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे प्रभुगावकर यांनी म्हटले आहे. सरकारच्या विद्यमान अधिसूचनेतील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया सर्वप्रथम पूर्ण करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

पात्र कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित केल्यानंतर त्यांना नियमित सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे लागू लाभही देण्यात यावेत. दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कामगारांच्या नोकरीची सुरक्षितता आणि त्यांना मिळणाऱ्या लाभांचा प्रश्न प्रलंबित ठेवणे योग्य नसल्याचे प्रभुगावकर यांनी म्हटले.

पीडब्ल्यूडी कंत्राटी कामगारांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून पात्र कामगारांच्या नियमितीकरणासाठी तसेच त्यांना देय लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी अॅड. प्रभुगावकर यांनी केली आहे.