Connect with us

गोवा खबर

सहा महिन्यांच्या मत्स्यपालन प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अर्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर:मत्स्योध्योग खात्याने १ ऑक्टोबर २०२६ पासून जुने गोवा येथील एला धावजी मच्छीमार प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या मत्स्योध्योग प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविले आहेत.

उमेदवारांनी पूर्ण भरलेले अर्ज १० सप्टेंबर २०२६ पूर्वी एला धावजी येथील मच्छीमार प्रशिक्षण केंद्रात सादर करावे.

किमान  आठवी उत्तीर्ण आणि १८ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवार प्रवेशासाठी पात्र आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना तसेच समुद्रातील कामाचा अनुभव असलेल्या मच्छीमार समाजातील तरुणांना प्राधान्य दिले जाईल. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना दरमहा रूपये १००० विद्यावेतन आणि मासेमारीच्या दरम्यान महागाई भत्ता म्हणून दररोज रु. १००/- दिले जातील.

हा अभ्यासक्रम मासेमारीच्या नौका आणि साधनांचे प्रशिक्षण, नौकानयन आणि खलाशी कौशल्याची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनची देखभाल व संचालन, आधुनिक जाळ्यांचे विणकाम आणि दुरुस्ती, सागरी खाद्यपदार्थांचे मूल्यवर्धन आणि विपणन, मत्स्यपालन  निर्मिती आणि पोहणे यांसाठी आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्जासाठी मच्छीमार प्रशिक्षण केंद्र, एला धावजी, जुने गोवा किंवा मत्स्योध्योग संचालनालयाचे मुख्य कार्यालय, पणजी किंवा मत्स्योध्योग संचालनालयाच्या जवळच्या उप-कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०८३२-२२२४८३८  या लँडलाईन क्रमांकावर किंवा www.fisheries.goa.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा .