Connect with us

गोवा खबर

सभापती डॉ. गणेश गांवकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Published

on

Spread the love

; ST आरक्षणाच्या निर्णयाबद्दल मानले आभार

गोवा खबर: गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गांवकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी (ST) राजकीय आरक्षणाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले.

या भेटीदरम्यान सभापती डॉ. गांवकर यांनी सध्याच्या गोवा विधानसभा इमारतीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने प्रस्तावित रौप्य महोत्सवी सोहळ्याची माहिती पंतप्रधानांना दिली.

गोव्याच्या संसदीय आणि लोकशाही प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत सभापतींनी नियोजित कार्यक्रमाचा तपशील पंतप्रधानांसमोर सादर केला.

गोवा विधानसभा इमारतीचा रौप्य महोत्सवी सोहळा संस्मरणीय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे, अशी विनंतीही सभापती डॉ. गांवकर यांनी केली.

या भेटीत गोव्याच्या जनतेप्रती तसेच राज्यातील लोकशाही संस्थांप्रती पंतप्रधान आणि केंद्र सरकारकडून सातत्याने मिळत असलेल्या सहकार्याबद्दल गोवा विधानसभेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.