Connect with us

गोवा खबर

अमित शहा यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सकारात्मक ग्वाही; गोवा विधानसभेत ST राजकीय आरक्षणाचा मुद्दा चर्चेत

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

या भेटीत मुख्यमंत्री सावंत यांनी गोवा विधानसभेत अनुसूचित जमाती (ST) समाजासाठी राजकीय आरक्षणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली. यावर अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या विषयावर सहकार्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

याशिवाय, गोवा सरकारकडून राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची आणि उपक्रमांची माहितीही त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली. राज्याच्या विकासासाठी भविष्यातही मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री सावंत यांनी या भेटीदरम्यान भारताच्या राष्ट्रपतींकडून गोवा पोलिसांना प्रदान करण्यात येणाऱ्या ‘President’s Police Colours’ सन्मान सोहळ्यासाठी अमित शहा यांना निमंत्रण दिले.

तसेच, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) गोवा प्रदेशाच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटन समारंभासाठीही भाजप गोवा प्रदेशाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले.

Continue Reading