Connect with us

गोवा खबर

गिरीश चोडणकरांवर सिद्धेश नाईक यांचा घणाघात; “तुमच्या कार्यकाळातच काँग्रेसची पडझड झाली”

Published

on

Spread the love

गोवा खबर: भाजपचे प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर जोरदार टीका करत, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच गोव्यात काँग्रेसची मोठी पडझड झाल्याचा आरोप केला. २०१८ ते २०२२ या काळात अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, तसेच अनेक काँग्रेस आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला. या घडामोडींवर चोडणकर यांनी उत्तर द्यावे, असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला.

नाईक यांनी भाजपविरोधात ₹१०० कोटींची मोहीम राबवली जात असल्याचा आरोप फेटाळून लावत, भाजपकडे सक्षम आणि समर्पित कार्यकर्त्यांची फौज असल्याचे सांगितले. पक्ष जनतेच्या विश्वासाच्या जोरावर निवडणूक लढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप ३० हून अधिक जागा जिंकून पुन्हा सरकार स्थापन करेल, असा ठाम विश्वास सिद्धेश नाईक यांनी व्यक्त केला.