Connect with us

गोवा खबर

गोव्यात आज ऑरेंज अलर्ट; पुढील सहा दिवस यलो अलर्ट कायम

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा देत भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (१ जुलै) संपूर्ण राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२ ते ७ जुलै या कालावधीत राज्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, बहुतांश भागांत जोरदार पावसासह 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४ आणि ५ जुलै रोजी काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून, या दोन्ही दिवसांसाठीही यलो अलर्ट लागू राहणार आहे.

जिल्हानिहाय पावसाच्या अंदाजानुसार, १ ते ७ जुलै दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोव्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची व्यापक शक्यता असून, राज्यभर पावसाची सक्रियता कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.