Connect with us

गोवा खबर

सावंतवाडीजवळील नेमळे येथे भीषण अपघात; गिरीच्या पंच व त्यांची बहीण ठार

Published

on

Spread the love

गोवा खबर : म्हापसाहून कणकवली-भिरवंडे येथे आपल्या मावशीला सोडण्यासाठी निघालेल्या कारला सावंतवाडी जवळील नेमळे येथे भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार अचानक चालकाला झोप आल्यामुळे महामार्गाच्या कडेला असलेल्या २० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील दोन्ही सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये गिरी-साळगाव (म्हापसा) येथील रहिवासी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नानोडकर (५८) व त्यांची बहीण विलासिनी जगन्नाथ सातारडेकर (५४) यांचा समावेश आहे. अपघातात कार चालक व गिरीचे माजी सरपंच सनी पांडुरंग नानोडकर (३६), पांडुरंग विष्णू नानोडकर (६५) आणि उज्वला नारायण कांबळी (४८) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सावंतवाडीतील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.