Connect with us

गोवा खबर

पर्वरीत घराला भीषण आग, ७ लाखांचे नुकसान

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्वरी येथील नेहरू नगरमधील एका घराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत सुमारे सात लाख रुपयांचे घरगुती साहित्य जळून खाक झाले असून कोणतीही जीवितहानी टळली आहे.

रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेहरूनगरमधील आशा सप्रे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याची माहिती एका वाटसरूने अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख संदीप नाईक यांच्यासह सलीम शेख, निलेश गावडे, महादेव नाईक, निहाल गोवेकर, मोहन नाईक, तुषार मांद्रेकर, योगेश मयेकर, सिद्धेश गावकर आणि इतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. या आगीत घराचे छत, विविध विद्युत उपकरणे, कपडे, फर्निचर आणि इतर मौल्यवान वस्तू भस्मसात झाल्या असून शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागल्याची शक्यता घरमालकाने व्यक्त केली आहे.