Connect with us

गोवा खबर

एफडीआयचा दणका : उत्तर गोव्यातील नऊ खाद्य व्यवसाय सील

Published

on

Spread the love

गोवा खबर : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने उत्तर गोव्यातील विविध पर्यटन आणि व्यावसायिक भागात राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत नऊ खाद्य व्यावसायिकांचे कामकाज तात्काल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कांदोळी, हणजूण, वागातोर आणि म्हापसा परिसरातील एकूण १७ रेस्टॉरंट्स, किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांची ही सखोल तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन न केल्याचे उघड झाले. म्हापसा येथील अलंकार थिएटर परिसरातील आस्थापनांचीही पुन्हा पडताळणी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही आणि दोषी आढळणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे एफडीआयने स्पष्ट केले आहे.