गोवा खबर : वीज खात्याचे अभियंते काशिनाथ शेट्ये यांना खोट्या खंडणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पोलीस अधीक्षकांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यात उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर, गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक जीवबा दळवी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक गौरीश मळीक आणि उपनिरीक्षक संकेत पोखरे यांनी पदाचा गैरवापर केल्याची शेट्ये यांची तक्रार होती, मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.