Connect with us

गोवा खबर

जीएमआर गोवा विमानतळात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर; 80 जणांचे रक्तदान

Published

on

Spread the love

गोवा खबर: जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला कर्मचारी, अधिकारी व विविध विभागांतील प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरामध्ये एकूण 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्तसंकलन प्रक्रिया पार पडली. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याने उपस्थितांनी अशा उपक्रमांचे स्वागत केले.

जीएमआर गोवा विमानतळ प्रशासनाने रक्तदात्यांचे आभार मानत समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.