Connect with us

गोवा खबर

स्वच्छ गोवा, हरित गोवा मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : स्वच्छ आणि हरित गोवा घडवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. स्वच्छ गोवा, हरित गोवा अभियानासह राज्यभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कडेला सुरू असलेल्या 90 दिवसांच्या वृक्षारोपण मोहिमेत जनसहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गोवा अधिक सुंदर, स्वच्छ आणि हिरवागार बनू शकतो.

त्यांनी नागरिकांना आपल्या परिसरात फळझाडांची लागवड करण्याचे आवाहन करत, अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे सांगितले.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेमुळे हरित आच्छादन वाढण्यास मदत होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासही हातभार लागणार आहे. गोव्याला अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक राज्य बनविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवाहन केले.