Connect with us

गोवा खबर

भाजप, एमजीपी आणि समर्थक अपक्ष आमदारांची बैठक; आगामी संघटनात्मक उपक्रमांवर चर्चा

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आज भाजप आमदार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (एमजीपी) आमदार आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तसेच एमजीपीचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित होते.

बैठकीत केंद्रातील मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि इतर संघटनात्मक उपक्रमांच्या नियोजनासंदर्भातही विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी आगामी काळातील विविध पक्षीय आणि संघटनात्मक कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी समन्वय साधण्यावर भर देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.