गोवा खबर : हवामान खात्याने गोव्यासाठी आज 27 मे रोजी यलो अलर्ट जारी केला असून उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांत काही ठिकाणी सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या जिल्हानिहाय पूर्वसूचना नकाशानुसार आज दोन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 28 मे ते 2 जून या कालावधीत कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नसला तरी राज्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचे अंदाजात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हानिहाय पावसाच्या अंदाजानुसार 27 मे रोजी राज्यातील बहुतांश भागांत पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.