Connect with us

गोवा खबर

गोव्यात पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी

Published

on

Spread the love

गोवा खबर : हवामान खात्याने गोव्यासाठी २५ आणि २६ मे २०२६ रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

त्यानंतर २७ मे ते ३१ मे दरम्यान राज्यात कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नसून हवामान सामान्य राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.