Connect with us

गोवा खबर

‘मद्यविक्री दुकानांना हिंदु देवतांची नावे ठेवण्यास बंदी घाला!’

Published

on

Spread the love

गोमंतक मंदिर महासंघाचे अबकारी आयुक्तांकडे मागणी

गोवा खबर:व्यावसायिक हेतूसाठी मद्यविक्री दुकाने आणि बार (मद्यालये) यांना देवतांची नावे देण्याच्या प्रथेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने अबकारी आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या नामकरणामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा दावा महासंघाने केला आहे.

गोमंतक मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाने नुकतेच अबकारी आयुक्त श्री. अश्विन चंद्रू यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन हे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात महासंघाचे श्री. जयेश थळी, सौ. विशाखा म्हांबरे, श्री. प्रमोद तुयेकर, श्री. दिलीप शेट्ये आणि श्री. राज बोरकर सहभागी होते.


समाजात देवतांना अत्यंत पवित्र स्थान आहे. असे असतांना मद्यविक्रीच्या दुकानांसाठी त्यांच्या नावांचा वापर करणे त्यांचा अनादर करणारे आहे. भविष्यात मद्यविक्रीची दुकाने किंवा मद्यालये यांसाठी देवता, हिंदूंची धार्मिक चिन्हे, तसेच हिंदु परंपरांशी संबंधित नावांच्या वापरास प्रतिबंध करणारे कडक नियम लागू करावेत, अशी विनंती महासंघाने या निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे.

Continue Reading