Connect with us

गोवा खबर

वाळपईच्या मानसी यमकरचा क्रीडा क्षेत्रात दमदार ठसा; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या कडून कौतुकाची थाप 

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्यातील वाळपई  येथील लहानग्या खेळाडू मानसी जे. यमकर हिने आपल्या क्रीडा कौशल्याने राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. २०२६ साली झालेल्या पहिल्या अंडर-१२ मिनी नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करत तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्व्जीत राणे यांनी मानसीची भेट घेत तिचे कौतुक केले. इतक्या लहान वयात राष्ट्रीय स्तरावर गोव्याचे प्रतिनिधित्व करणे ही केवळ सहभागाची बाब नसून, आत्मविश्वास, जिद्द आणि नव्या भारतातील उभरत्या ‘नारी शक्ती’चे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

राणे यांनी यावेळी नमूद केले की, “जेव्हा मुली पुढे जातात, तेव्हा देश नव्या उंची गाठतो. आज आपल्या मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत आणि नवे मानदंड निर्माण करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.”

मानसीसारखे तरुण खेळाडू समाजासाठी प्रेरणादायी असून, गोव्यासाठी अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, भविष्यातही ती अधिक यश संपादन करून राज्याचे नाव उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या यशामुळे सत्तरी तालुक्यासह संपूर्ण गोव्यात अभिमानाचे वातावरण असून, युवा पिढीसाठी मानसी यमकर एक प्रेरणास्थान ठरत आहे.