Connect with us

गोवा खबर

दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण खात्याद्वारे दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण

Published

on

Spread the love

गोवा खबर : दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण खात्यातर्फे २१ मार्च २०२६ पासून घरोघरी दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तीं शोधणे, त्यांच्या गरजांचे मूल्यांकन करणे आणि त्यांना विविध सरकारी योजना व सेवा मिळवून देणे या उद्देशाने सांगे आणि डिचोली तालुक्यांमध्ये हे सर्वेक्षण प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणाव्दारे दिव्यांग व्यक्तींचा माहिती एकत्र करून त्यांना विविध योजना आणि सेवांचा लाभ मिळवून देण्यास मदत होईल. समाज कल्याण संचालनालयाचे अधिकारी घरोघरी जाऊन दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करतील. सर्वसामान्य जनतेने अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे आणि अचूक माहिती द्यावी अशी विनंती आहे. सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींची माहिती देऊन सरकारला योजनांची अंमलबजावणी करण्यास सहकार्य करावे. सर्वेक्षणाचे पुढील टप्पे योग्य वेळी इतर तालुक्यांमध्येही राबविले जातील.

कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा मदतीसाठी नागरिकांनी गोवा सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण खात्याशी संपर्क साधावा.