गोवा खबर : गोव्यातील एका मोठ्या इव्हेंटमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात काँग्रेस उद्या सोमवारी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) तक्रार दाखल करणार आहे.
प्रमु्ख आरोप:
- बुक माय शो वर निशाणा : या इव्हेंटच्या आयोजकांसह ‘बुक माय शो’ विरोधात तक्रार केली जाणार आहे. या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाटकरांनी नमूद केले.
- ड्रग्जचा प्रसार : याच पत्रकार परिषदेत दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी खळबळजनक आरोप केला की, शाळा-महाविद्यालयांबाहेर ड्रग्ज पेडलर फिरत असून चॉकलेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ड्रग्ज दिले जात आहे. काही मंत्री आणि आमदारांचे ड्रग्ज डीलर्सशी ‘मिलीभगत’ असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला असून, वेळेत आवर न घातल्यास गोव्याची स्थिती पंजाबसारखी होईल, अशी भीती व्यक्त केली.