Connect with us

गोवा खबर

 2047 पर्यंत  जगात नंबर वन विकसित भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करूया: तानावडे 

Published

on

Spread the love
गोवा खबर: भाजपा पक्ष सर्वात प्रथम देशाला प्राधान्य देणारा पक्ष, तर काँग्रेस पक्ष हा अगोदर पक्षाला प्राधान्य देणारा आणि फॅमिली राज ला प्राधान्य देणारा पक्ष, परंतु भाजपने कधीही देशाचे पंतप्रधान किंवा देशाचा केंद्रीय भाजप नेता राज्य प्रदेश अध्यक्ष हा फॅमिली राज मधील केला नाही. भाजप अंत्योदय तत्व मानणारा पक्ष आणि 2047साली  विकसित भारत जगात नंबर वन भारत देश बनवण्यासाठी भाजपासोबत भारतीय जनता सोबत आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहे.त्या योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य याही पुढे करावे. असे आवाहन राज्यसभा खासदार सदानंद शेट  तानावडे यांनी मांन्द्रे  मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा अर्थात पंडित दीनदयाळ उपाध्ये प्रशिक्षण महा अभियान अंतर्गत मांन्द्रे  मतदार संघातील भाजपच्या मंडळाला ट्रेनिंग देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन वजरी येथील हिरा फार्म मध्ये आयोजित केले होते.
त्यावेळी या कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर खासदार सदानंद शेट  तानावडे बोलत होते. यावेळी माजीं  आमदार तथा बाल भवनचे चेअरमन दयानंद सोपटे, मांन्द्रे  भाजप मंडळ अध्यक्ष उत्तम पोखरे सेक्रेटरी प्रदीप नाईक परेश सावंत व सुखाजी  नाईक, गोरख मांन्द्रेकर उपस्थित होते.

सुरुवातीला दीनदयाळ उपाध्ये यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले

 2014 ते आतापर्यंत एकाही केंद्र सरकारच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही 
 खासदार सदानंद तानावडे यांनी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सत्ता स्थापन केली. ती आतापर्यंत जे जे मंत्री झाले.त्या एकाही मंत्र्यावर नेत्यावर भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नाही. त्यामुळे भारत भ्रष्टाचार मुक्त करण्याची योजनाही प्रंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची असल्याचा दावा यावेळी तानावडे यांनी केला.
 खासदार सदानंद शेट  तानावडे यांनी पुढे बोलताना सांगितले विकास करत असतानाच क्लीन राहणे ही तत्व भाजपने बाळगली असल्याचे सांगितले.
 नारीशक्ती वंदन अभियान भाजपनेच मंजूर केले 
 देशात राज्यात प्रत्येक निवडणुकीत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण मिळावे यासाठी नारीशक्ती वंदन अभियान हे भाजपनेच मंजूर केल्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगून त्याचा लाभ महिलांना होणार आहे.
 यावेळी खासदार सदानंद शेट तानवडे यांनी केंद्र सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आमदार मंत्री भाजपचे कार्यकर्ते अधिकारी करत आहात. याही पुढे सर्व प्रकारच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरातील घटकापर्यंत पोहोचवून प्रत्येकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
 बाल भवन केंद्राचे चेअरमन तथा माजीं  आमदार दयानंद सोपटे  यांनी यावेळी बोलताना मांन्द्रे मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थी भावनेने मागच्या चार वर्षापासून जे जे भाजपने उपक्रम पक्षाला मंडळाकडे दिले ते निस्वार्थी भावनेने यशस्वीपणे केले. आणि याही पुढे ते कार्यक्रम राबवून यशस्वी करणार असल्यास ची ग्वाही यावेळी दिली. चार वर्षात मांन्द्रे  मतदार संघात भाजपचा आमदार नसला तरीही भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याला तोड नसल्याचे माजी आमदार दयानंद सोपटे म्हणाले.
 दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेला शेकडो भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि मन लावून जे भाजपचे नेते मार्गदर्शन करत होते. ते त्या सूचना ऐकून कागदावर लिहून घेत असल्याचेही चित्र दिसून येत होते.