गोवा खबर: मणिपाल हॉस्पिटल गोवा या भारतातील आघाडीच्या एकात्मिक हेल्थकेअर नेटवर्क असलेल्या मणिपाल हॉस्पिटल ग्रुपच्या हॉस्पिटल तर्फे आज माही (मणिपाल हॉस्पिटल हेल्दी इंडिया) या नवी पिढीतील रिटेलवर आधारीत प्रतिबंधात्मक अशा हेल्थ ॲन्ड वेलनेस मंचाची घोषणा करण्यात आली असून यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा सोप्या, सहज उपलब्ध आणि पर्सनलाईज्ड करण्यावर जोर देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन पणजी, गोव्यातील मणिपाल हॉस्पिटल्स च्या कन्सल्टंट इंटर्नल मेडिसिन फिजिशियन डॉ. माया पै धुंगाट यांच्या हस्ते करण्यात आली. डॉ. धुंगाट या कुशल जनरल आणि इंटर्नल मेडिसिन क्षेत्रातील तज्ञांसह योवळी उपस्थित मान्यवरांमध्ये हॉस्पिटल डायरेक्टर श्री. सुरेंद्र प्रसाद, मार्केटिंग मॅनेजर श्रीमती गौरी नाईक, मेडिकल सुप्रिंटेंडंट डॉ. शेरीन भट, ऑपरेशन्स मॅनेजर डॉ.प्रतीमा भदोरिया, इंजिनियरींग ॲन्ड मेंटेनन्स मॅनेजर श्री. सुभाष नायक, ह्युमन रिसोर्स मॅनेजर डेलिना फिगुएरेडो, नर्सिंग सुप्रिंटेंडंट अनिता टी, फायनान्स मॅनेजर जिन्स जोस यांच्या सह विविध कर्मचारी आणि रुग्ण उपस्थित होते.
प्रिव्हेन्टिव्ह हेल्थकेअर ची भारतातील बाजारपेठ ही २०२६ मध्ये १६ हजार कोटी रुपयांची असून यामध्ये २२ टक्के सीएजीआर ने वाढ होण्याची शक्यता आहे. हेल्थ चेकअप बाजारपेठ ही २०३० पर्यंत १० हजार कोटींहून अधिक होण्याची शक्यता असून लवकर स्क्रीनिंग आणि नियमित आरोग्य तपासणी ही वेगाने वाढण्याची शक्यता आहे. महामारी नंतर यामध्ये मोठी वाढ झाली असून आरोग्या विषयी जागरुकता आणि ग्राहक हे अधिक प्रमाणात प्रतिबंधात्मक तपासणीला प्राधान्य देत आहेत. त्याच बरोबर भारतात दीर्घकालीन आजारांचा ताण हा वाढत असून ही संख्या २७० दशलक्ष लोकांवर गेली आहे. यामुळे अधिकाधिक लोक हे वेळेत निदान आणि प्रतिबंधात्मक तपासणीवर भर देत आहेत.
यावेळी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल गोव्याचे संचालक श्री. सुरेंद्र प्रसाद यांनी सांगितले “ प्रिव्हेन्टिव्ह हेल्थकेअर हा दीर्घकालीन आरोग्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. लवकर निदान आणि नियमित आरोग्य तपासणी या दोन गोष्टींमुळे जुन्या आजारांना कमी करण्यात महत्त्वाची भुमिका बजावतात. माहीच्या माध्यमातून आम्ही लोकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने संरचनात्मक दृष्टिकोन बजावण्यास सक्षम करत असून यामुळे ते योग्य निर्णय घेऊन ते प्रतिबंधात्मक आरोग्याला त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनवू शकतील.”
माहीची संकल्पना ही एक मैत्रीपूर्ण, विश्वसनीय आणि पर्सनलाईज्ड वेलबीईंग साठीचा मित्र म्हणून मणिपाल हॉस्पिटल्स तर्फे निर्माण करण्यात आली असून याचे डिझाईन हे प्रिव्हेन्टिव्ह हेल्थकेअर सोपे करुन प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाला ते सहज उपलब्ध करुन देण्यासाठी करण्यात आले आहे. ग्राहभिमुख, वेगाने प्रतिसाद देणारा असा हा आरोग्य मंच असून यामध्ये मानवी दृष्टिकोन असल्याने माही हे वापरकर्त्यांना आरोग्य प्रवासात प्रत्येक मंचावर मदत करते. यामध्ये प्रतिबंधात्मक तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्यासह लसीकरण चा समावेश आहे.
विविध वयोगटातील लोकांच्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन माही तर्फे विचारपूर्व तयार केलेल्या आणि कस्टमाईज्ड प्रोफाईल नुसार तपासणी पॅकेजेस देत असून ही पॅकेजेस सध्या तरुण, पुरुष, महिला, वरिष्ठ आणि सुपर सिनियर्स साठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या उत्पादनांची सुरुवात टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येणार असून यामुळे ही उत्पादने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी आणि बदलत्या आरोग्य गरजांनुसार सुरु करण्यात येणार आहेत.
माही सर्वसमावेशक आणि कनेक्टेड प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर इकोसिस्टमचे प्रतिनिधीत्व आहे. या मंचा मध्ये खालील गोष्टींचे एकत्रिकरण करण्यात आले आहे –
• माही चेक मध्ये विशेष अशा स्क्रीनिंग पॅकेजेस आहेत.
• माही डॉक मध्ये २४ तास डॉक्टरांचा सल्ला.
• माही शॉट्स मध्ये मोठ्यांसाठी आणि प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती
या सर्व सेवा एकत्रित पणे अजोड प्रतिबंधात्मक काळजी साठीचे एक सातत्य निर्माण करतात. डिजिटल टचपॉईंट्सच्या माध्यमातून म्हणजेच वेबसाईट आणि मोबाईल ॲप सह हॉस्पिटल आणि सामाजिक स्तरावर सहकार्याने उपलब्ध असल्याने माही ही सुविधा सोपी, आकर्षक आणि व्यक्ती तसेच कुटुंबाला संभाषणात्मक मार्गांनी त्यांच्या आरोग्य तपासणीचे व्यवस्थापन सहज करण्यास प्रोत्साहीत करते. यामध्ये अगदी नियमित चेकअप पासून ते तज्ञांचा सल्ला आणि वेळेत लसीकरण यांचे व्यवस्थापन करता येते.
मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेतृत्वाने त्यांच्या प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांना सातत्यपूर्ण करुन ती संरचनात्मक सवय करण्याची आपली वचनबध्दता अधोरेखित केली आहे. डिजिटल सोपेपणा एकत्र करुन काळजीपूर्वकतेने तयार केलेली पॅकेजेस, विश्वसनीय क्लिनिकल कुशलता यांना एकत्र करुन माही हे उत्पादन एक सकारात्मक जीवनशैलीची निवड करण्यास योग्य असून यामुळे व्यक्तीला योग्य निर्णय घेऊन जोडलेले राहून दीर्घकाळात अधिक आरोग्यपूर्ण राहण्यास मदत केली आहे.