Connect with us

गोवा खबर

इंडिया एनर्जी वीक २०२६ मध्ये सोलेक्स एनर्जी लिमिटेड देणार भारतातील स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतातील अग्रगण्य सोलर मॉड्यूल उत्पादकांपैकी एक आणि नवीकरणीय ऊर्जा सेवा प्रदाता असलेली तसेच एनएसईवर SOLEX म्हणून सूचीबद्ध असलेली सोलेक्स एनर्जी लिमिटेड गोव्यामध्ये २७ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित होणाऱ्या इंडिया एनर्जी वीक २०२६ मध्ये सहभागी होणार आहे. कंपनीने उच्च-कार्यक्षम सौर मॉड्यूल्स आणि एकात्मिक सौर ऊर्जा उत्पादन सेवांची नवी श्रेणी सादर केली असून, याद्वारे भारतातील स्वच्छ ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला पुढे नेण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी दिली आहे.

इंडिया एनर्जी वीक २०२६ हा उपक्रम भारताचे एक प्रमुख आंतरराष्ट्रीय ऊर्जा व्यासपीठ म्हणून ओळखला जात असून सुरक्षित, परवडणाऱ्या आणि शाश्वत ऊर्जा भविष्याकडे जाण्याच्या मार्गांवर विचारविनिमय करण्यासाठी जागतिक ऊर्जा क्षेत्रातील नेतेमंडळी, धुरीण, तंत्रज्ञान प्रदाते आणि नवोन्मेषकांना एकत्र आणणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार तसेच भारतीय पेट्रोलियम उद्योग महासंघ (FIPI) आणि डीएमजी इव्हेंट्स यांच्याद्वारे संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला जातो.

भारताने २०७० सालापर्यंत नेट-झिरो स्थिती साधण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट आखले आहे. या उद्दिष्टाशी सुसंगत असे राज्याचे धोरण राबवण्याचे महत्व गोवा राज्याच्या विकसित होत असलेल्या सौर ऊर्जाक्षेत्रातून प्रतिबिंबित होत आहे. दर्जेदार उत्पादने व सेवा, दीर्घकालीन विश्वसनीयता आणि कार्यक्षम उपयोजना या बाबींवर लक्ष केंद्रित केल्याने गोवा राज्य एक विश्वासार्ह आणि विस्तारक्षम सौरऊर्जा वाढीची बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे.

या उपक्रमामध्ये, सोलेक्स एनर्जी लिमिटेड आपली प्रगत उत्पादन क्षमता, भविष्यासाठी सज्ज मॉड्यूल तंत्रज्ञान आणि युटिलिटी-स्केल, व्यावसायिक, औद्योगिक आणि उदयोन्मुख ऊर्जावापरासाठी विकसित सर्वसमावेशक सौरऊर्जा उत्पादन व सेवांवर प्रकाश टाकणार आहे. तीन दशकांचा दर्जेदार उत्पादनसेवा देण्याचा विश्वास, जगभर वाढता विस्तार या कामगिरीच्या आधारे या प्रदर्शनामध्ये सहभागी होत असलेल्या सोलेक्सचा गुणवत्ता, नावीन्यता आणि विश्वासार्हता या शक्तिस्थांनावर असलेला भर ग्राहकांना अनुभवता येणार आहे.

इंडिया एनर्जी वीक २०२६मधील सोलेक्सचा सहभाग भारतातील देशांतर्गत सौर उत्पादन परिसंस्थेला मजबूत करण्यात आणि देशाला ऊर्जा सुरक्षा व शाश्वततेकडे नेण्याच्या संक्रमणास पाठिंबा देण्यात कंपनीची भूमिका अधोरेखित करतो. भारताच्या दीर्घकालीन स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांशी सुसंगत धोरण राबवत कंपनी पुढील पिढीतील तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि कौशल्य विकासात गुंतवणूक करत आहे.

ओएनजीसी ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, काणकोण-गोवा येथे आयोजित इंडिया एनर्जी वीक २०२६मध्ये, सोलेक्स एनर्जी लिमिटेडचे दालन मांडले जाणार आहे. सोलेक्स एनर्जीच्या नाविन्यपूर्ण स्वच्छ ऊर्जा उत्पादने व सेवांची माहिती घेण्यासाठी ग्राहक व नागरिकांनी प्रदर्शनातील दालन क्रमांक 3G28ला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.