Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृतीदिनानिमित्त शूर पोलीस कर्मचाऱ्यांना वाहिली आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृतीदिनानिमित्त देशाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे धाडस आणि बलिदान यांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राष्ट्र आणि नागरिकांच्या रक्षणाप्रती त्यांच्या अढळ निष्ठेची नोंद पंतप्रधानांनी घेतली.

एक्स या समाजमाध्यमांवरून दिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले- “पोलीस स्मृतीदिनानिमित्त, आम्ही आपल्या  पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्याला सलाम करतो आणि कर्तव्य बजावताना त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करतो. त्यांची  दृढ निष्ठा आपले राष्ट्र आणि लोक सुरक्षित ठेवते. संकटकाळात आणि गरजेच्या वेळी त्यांचे शौर्य आणि वचनबद्धता कौतुकास्पद आहे.