Connect with us

गोवा खबर

गोव्याच्या राज्यपालपदी पुसापति अशोक गजपती राजू यांची नियुक्ती

Published

on

Spread the love

गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लद्दाखचे नायब राज्यपाल  ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच, राष्ट्रपतींनी खालीलप्रमाणे राज्यपाल/नायब राज्यपाल यांची नियुक्ती केली आहे, प्रा. अशीम कुमार घोष यांची हरियाणा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुसापति अशोक गजपती राजू  यांची गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कविंदर गुप्ता यांची लद्दाख या  केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्त्या त्यांच्या संबंधित पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील.