गोवा खबर : क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने २०२४-२०२५ या वर्षासाठी दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यासाठी गोवा क्रीडा प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या संबंधित राज्यस्तरीय क्रीडा संघटनांमार्फत पात्र खेळाडूंकडून अर्ज मागविले आहेत.
कास्यपदक, प्रशस्तिपत्र आणि २.०० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे आणि मागील वर्षी (म्हणजे १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५) ऑलिंपिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि इतर आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त स्पर्धांसारख्या केवळ वरिष्ठ गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोव्यातील खेळाडूंपैकी सर्वाधिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जाईल. खेळाडूचे गोव्यात किमान १५ वर्षांचे वास्तव्य असले पाहिजे.
अर्ज नमुना कांपाल, पणजी येथील क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाच्या क्रीडा विभागाच्या कार्यालयातून सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन दिवसांत घेता येईल आणि ते प्रत्यक्षरीत्या ३१ जुलै २०२५ पूर्वी सादर करावेत उशिरा पोचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाहीत.