Connect with us

गोवा खबर

सनातन संस्थेच्या फोंडा येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात सु.ग. शेवडे यांचे होणार मार्गदर्शन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा एक हजार पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ समाजाला घेता यावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गुरुवार, १० जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता राजीव गांधी कला मंदिर, बेतोडा रोड, फोंडा येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महोत्सवात विश्वविख्यात प्रवचनकार सुरेश शेवडे यांचे ‘सनातन हिंदु धर्म आणि धर्माचरणाची आवश्यकता’ या विषयावर विशेष मार्गदर्शन होणार आहे.

शेवडे यांचे मराठी, संस्कृत, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी या पाचही भाषांवर प्रभुत्व आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये इंग्लंड येथील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती दिली होती. त्यांनी आतापर्यंत १७ देशांत १३ सहस्र ५०० हून अधिक प्रवचने दिली आहेत. वर्ष २०२४ मध्ये सुप्रसिद्ध कथाकार मोरारीबापू यांनी त्यांना ‘महर्षि व्यास’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

गुरुपौर्णिमा महोत्सवात  भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्याच्या प्रेरणादायी व्हिडिओचे प्रक्षेपण आणि रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ होणार आहे. तसेच विशेष म्हणजे या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते  चेतन राजहंस यांचे ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या गुरुपौर्णिमा महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.