Connect with us

गोवा खबर

जनावरांच्या संरक्षणासंबंधी सल्ला

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तर गोवा प्राण्यावरील क्रुरता प्रतिबंध जिल्हा संस्थेने लोकांना एक दयाळू समाज निर्माण करण्याचे आवाहन केले आहे जिथे जनानरांना दयाळू आणि आदराची वागणूक मिळेल.

सदर संस्था ही जनावरांवर होणाऱ्या क्रूरता प्रतिबंधासाठी काम करते. जनावरांवरांची काळजी घेणाऱ्यांना छळू नये म्हणून कायद्याअंतर्गत सर्व प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार संस्थेला आहे. भारतीय संविधानाच्या कलम ५१ ए (जी) आणि प्राणी जन्म नियंत्रण (ABC) नियम, २०२३ नुसार, सर्व रहिवासी, बांधकाम व्यावसायिक, सोसायटी संघटना, पंचायत आणि नगरपालिका यांनी सामुदायिक प्राण्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

सामुदायिक प्राण्यांना दया दाखविणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना खायला घालणे अत्यंत महत्वाचे आहे ज्यामुळे अशी जनावरे मानवांसाठी अनुकूल बनविण्यास मदत करते. जनावरांची काळजी घेणाऱ्यांना कायद्याने संरक्षण मिळते. सामुदायिक प्राण्यांच्या कृतींसाठी कोणत्याही खाद्यदात्याला जबाबदार धरता येणार नाही कारण ते मालकीचे पाळीव प्राणी नाहीत. सामुदायिक प्राण्यांना दुखापत करणे, अपंग करणे, मारणे किंवा विष देणे हा दंडनीय गुन्हा आहे, ज्यामध्ये ५  वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी किंवा प्राण्यांवरील क्रूरतेच्या कोणत्याही घटनांची तक्रार करण्यासाठी  spcagoa.north@gmail.com . वर ईमेल करावा किंवा ७९७२४३६८९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.