Connect with us

गोवा खबर

जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर :सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग रोजगाराचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करतात, कुशल आणि अकुशल कामगारांना संधी प्रदान करतात ज्यामुळे रोजगार निर्मिती आणि बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागतो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमुळे व्यक्तींना तुलनेने कमी गुंतवणूक आवश्यकतांसह त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन उद्योजकतेला प्रोत्साहन देतात असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

आज पणजी येथे जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन साजरा करण्यासाठी ‘शाश्वत आणि डिजिटल भविष्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला सक्षम बनविणे या संकल्पनेवर उद्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नवीनीकरण आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात, आर्थिक गतिमानता वाढवितात आणि समाजात उद्योजकतेची संस्कृती वाढवितात असे सांगितले. “दुर्गम किंवा अविकसित भागात व्यवसाय स्थापन करून, आर्थिक कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण करून, शहरी केंद्रांमध्ये उद्योगांचे केंद्रीकरण कमी करून आणि ग्रामीण आणि निम-शहरी भागात आर्थिक संधी पसरवून प्रादेशिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग महत्त्वपूर्ण भूमिका बजावितात ज्यामुळे उत्पादनात विविधता येते आणि नवीनीकरणाला चालना मिळते, उत्पन्नातील विषमता कमी होते आणि मोठ्या उद्योगांना आधार मिळतो, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगां अंतर्गत ज्यांनी आपले उपक्रम सुरू केले आहेत, त्यापैकी ५०% महिला आहेत, जे कौतुकास्पद आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या दोन महिला सुविधा केंद्रांमुळे अधिकाधिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उध्योग उद्योजकतेसाठी व्यापक संधी प्रदान करतात आणि म्हणूनच युवकांना उद्योग नोंदणी पोर्टलवर मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आणि उद्योजक बनण्याचे आणि स्वावलंबी होण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि विकसित गोवा मिशन साध्य करण्यासाठी सरकारला मदत करण्याचे आवाहन केले.

उद्योग मंत्री माविन गोदिन्हो यांनी आपल्या भाषणात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उध्योग अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावित आहे. म्हणूनच, इच्छुकांना तळागाळात पोहोचून राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उध्योगांसाठी अनुकूल वातावरण विकसित करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

पुढे बोलताना माविन गोदिन्हो यांनी सरकार महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देते आणि त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात जमिनींचे वाटप केले आहे. त्यांनी तरुणांना सरकारी नोकऱीच्या मागे न धावता राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले.

भारत सरकार ऱॅंप अंतर्गत “व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण” देते जेणेकरून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उध्योगांना सक्षम करण्यासाठी कार्यशाळांद्वारे महत्त्वपूर्ण व्यावसायिक आव्हानांना तोंड द्यावे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उध्योगांना सक्षम बनवावे, नवीनीकरणास आणि आर्थिक विकासाला चालना देणे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनीही या प्रसंगी भाषण केले.

सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सहा बचत गटांना उद्यम नोंदणी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी त्यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उध्योग टीव्हीअॅप आणि आयआरआयएस प्री-डॉट अ‍ॅपचेही लाँच केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक श्री योगेश केरकर यांनी उद्योजक, विद्यार्थी आणि इतर उपस्थितांना त्यांची यशोगाथा सांगितली.

उद्योग सचिव सुनील अंचिपाका आयएएस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर उद्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाचे संचालक अश्विन चंद्रू, आयएएस यांनी आभार मानले.