Connect with us

गोवा खबर

पंढरपूरमध्ये गोवा भवन उभारण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांसाठी गोवा भवन साकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केला आहे. साखळी रवींद्र भवन येथे आयोजित दिंडी व हरिपाठ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

पंढरपूरात गोवा सरकारला सुमारे ४ हजार चौरस मीटर जागा मिळाल्यास, अयोध्या भवनाच्या धर्तीवर विठ्ठल भक्तांसाठी गोवा भवन उभारण्यात येईल.

मुख्यमंत्री स्वतः वारकऱ्यांसोबत हरिपाठात सहभागी झाले होते व विठ्ठल नामस्मरणात दंग झाले. या कार्यक्रमात उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, न्हावेली, अमोणा आणि विठ्ठलापूर साखळी येथील वारकरी मंडळ प्रमुख सहभागी होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना निवासाची योग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.