Connect with us

गोवा खबर

गोव्याचा इतिहास अॅनिमेशनद्वारे लोकांपर्यंत पोहोचणार

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याचा खरी इतिहास आता विद्यार्थ्यांपर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत अॅनिमेशनच्या माध्यमातून पोहोचवला जाणार आहे. राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्यावतीने सध्या एका अॅनिमेशन वेबसाइट आणि वेब सिरीजवर काम सुरू आहे. ही माहिती पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी क्रांतिदिनानिमित्त मडगाव येथील डॉ. राम मनोहर लोहिया मैदानात आयोजित कार्यक्रमात दिली.

या वेब सिरीजमध्ये कुंकळ्ळीतील १६ महानायकांची क्रांती, पोर्तुगीज राजवटीतील अत्याचार, धर्मांतर, आणि गोमंतकीयांची लढाई यांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना गोव्याच्या इतिहासाची खरी माहिती मिळावी, हा यामागचा उद्देश आहे.

मंत्री फळदेसाई म्हणाले की, सरकारने ‘हेरिटेज पॉलिसी’ लागू केली असून, १०० वर्षे पूर्ण झालेली व त्याखालील वारसास्थळे दोन्ही या योजनेचा भाग ठरणार आहेत. गोव्याच्या इतिहासाला अधिक प्रभावी पद्धतीने सादर करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.