गोवा खबर : साहित्य अकादमीने २०२५ सालासाठी जाहीर केलेल्या बाल व युवा पुरस्कारांत गोव्यातील दोन कोकणी साहित्यिकांची निवड झाली आहे. ज्येष्ठ लेखिका नयना आडारकर यांना बाल साहित्य पुरस्कार तर तरुण लेखिका ग्लिनिस डायस यांना युवा साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
नयना आडारकर यांचा “बेलाबायचो शंकर आणी हेर काण्यो” हा कथासंग्रह मुलांसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून, ग्लिनिस डायस यांचा “गावगाथा” हा लघुकथा संग्रह तरुण पिढीला लक्ष्य करत लिहिण्यात आला आहे. या दोघींच्या सर्जनशील कार्याला गोवाभरातून शुभेच्छा मिळत आहेत.

तसेच, महाराष्ट्रातील नांदेडचे डॉ. सुरेश सावंत यांच्या “आभाळमाया” या ग्रंथाला बालवाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. मराठीतील युवा लेखक प्रदीप कोकरे यांच्या “खोल खोल दुष्काळ डोळे” या कादंबरीची युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. साहित्य अकादमीने यावर्षी २३ भाषांमधील लेखकांना पुरस्कार जाहीर केले आहेत.