Connect with us

गोवा खबर

पंतप्रधानांनी भारत आणि सौदी अरेबियामधील वाढते संबंध केले अधोरेखित

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबन्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत भारत आणि सौदी अरेबियामधील वाढते संबंध अधोरेखित केले. मोदी यांनी सौदी अरेबियाचा उल्लेख एक विश्वासू मित्र आणि धोरणात्मक सहयोगी असा केला आणि 2019 मध्ये धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या स्थापनेपासून द्विपक्षीय संबंधांचा लक्षणीय विस्तार झाल्यावर भर दिला.  

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वरील पोस्टमध्ये लिहिले: “@arabnews ला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान @narendramodi यांनी भारत आणि सौदी अरेबियामधील वाढते संबंध अधोरेखित केले.

त्यांनी सौदी अरेबियाचे वर्णन “एक विश्वासू मित्र आणि धोरणात्मक सहयोगी” असे केले आणि 2019 मध्ये धोरणात्मक भागीदारी परिषदेची स्थापना झाल्यापासून द्विपक्षीय संबंध लक्षणीयरित्या  विस्तारले  यावर  भर दिला.