गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना विशेषता: ख्रिश्चन बांधवाना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ईस्टर हा येशू ख्रिश्तांचा पुनरुत्थानाचा दिवस. येशू ख्रिश्तांना क्रॉसवर मारल्यानंतर तीन दिवसांनी येशू ख्रिश्तांचे पुनरुत्थान झाले. हा दिवस म्हणजे जीवनाने मृत्यूवर मिळविलेला विजयाचे प्रतिक आहे. ईस्टर हा दैवी प्रतीक आहे. ईस्टर हा आनंदाचा दिवस आहे.
येशू ख्रिश्तांची उदात्त मूल्ये अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्याची शक्ती देतात. येशू ख्रिश्तानी प्रेम, करुणा, आशा, विश्वास, जबाबदारी आणि क्षमा या शाश्वत मूल्यांचा उपदेश केला. त्यांच्या शिकवणी प्रत्येकाला परिवर्तन करण्यास आणि शांत आणि आनंदी जीवन जगण्यास मदत करतात. ईस्टर सणानिमित्ताने समाजात बंधुता आणि मानवतेची भावना वाढीस लागते असे मुख्यमंत्री म्हणतात.
ईस्टरचा सण सर्वांना पापावर विजय मिळविण्याची प्रेरणा देवो आणि सर्वांच्या जीवनात अधिक शांतता, समृद्धी, आनंद घेऊन येवो असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.