Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना गुढी पाडव्याच्या शुभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात म्हणून चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढी पाडवा सण साजरा करतात. हा सण प्रत्येकासाठी आनंदाचे आणि समृद्धीचें पर्व घेवून येवो.

गुढी पाडव्याच्या शुभप्रसंगी  आपल्या स्वप्नांची, आशा-अपेक्षांची आणि आनंदाची नवीन सुरुवात होवो. हे नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात यश, आनंद आणि चांगले आरोग्य घेवून येवो, असे मुख्यमंत्री म्हणतात.

मुख्यमंत्र्यानी गोव्यातील लोकांना शांतता आणि सामाजिक सलोखा राखून स्वयंपूर्ण गोवा आणि विकसित भारताचे उद्दिश्ट पूर्ण करण्यास योगदान देण्याचे आवाहन केले.

गुढी पाडव्याचा सण प्रत्येकाच्या जीवनात, भरभराट आणि समृध्दी घेवून येवो, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.