गोवा खबर : पणजीतील पशूसंवर्धन आणि पशू चिकित्सा खात्याने राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमाखाली १ एप्रिलपासून जनावरांच्या पाय आणि तोंडाला होणा-या रोगाविरूध्द लस देण्याच्या कार्यक्रमास सुरवात करणार आहे. ३० दिवसांपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे.
या कार्यक्रमाखाली सर्व जनावरे आणि म्हशींना लस देण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहे आणि जनावरांची रोगप्रतिकार शक्ती तपासण्यासाठी लस देण्यापूर्वी आणि त्यानंतर सेरा नमुने घेण्यात येतील.
मार्गदर्शक तत्वानुसार लसीकरण केलेल्या जनावरांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या कानाला बिल्ला लावणे अनिवार्य आहे. लसीकरणावेळी खात्याच्या कर्मचा-यांना व पथकाला सहकार्य करण्याची विनंती दूग्ध शेतक-यांना करण्यात आली आहे.