Connect with us

गोवा खबर

पेपर लीक प्रकरण : उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Published

on

Symbolic image
Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारने जस्टीस (निवृत्त) आरएमएस खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. ही समिती गोवा विध्यापिठाच्या भौतिकशास्त्र आणि अप्लाईड सायन्सीस विभागाच्या पेपर लिक प्रकरणाची चौकशी करणार आहे.

गोवा विध्यापिठाच्या भौतिकशास्त्र आणि अप्लाईड सायन्सीस विभागात पेपर लिक प्रकरणाची समिती अचुक माहिती आणि पुरावे मागते. अशी माहिती प्रतिज्ञापत्राव्दारे बंद आवरणातून डॉ जर्वासियो एसएफएल मेंडिस, संपर्क अधिकारी, अतिरिक्त संचालक कचेरी, उच्च शिक्षण संचालनालय, गोवा शिक्षण प्रकल्प, आल्त पर्वरी गोवा ४०३५२१ या पत्त्यावर वैयक्तिकरीत्या किंवा स्पीड पोस्टने १ एप्रिल २०२५ पर्यंत सुपूर्द करावी.